कोल्हापूर : सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष आपला पूर्ण कस लावत आहेत. महाविकास आघाडीमध्ये आज महत्त्वाची बैठक पार पडते आहे. या बैठकीमध्ये आज एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. कोल्हापूर लोकसभा मतदार संघासाठी काँग्रेसकडून शाहू छत्रपतींना उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. तर शिवसेना देखील या जागेसाठी आग्रही होती. हा तिढा सुटला असून आता छत्रपती शाहूंनाच काँग्रेस कडून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी दिली जाणार आहे.
आज महाविकास आघाडीचे जागा वाटपाबाबतची महत्त्वाची बैठक पार पडते आहे. या बैठकीमध्ये महत्त्वाच्या जागांबाबतचा तिढा आणि स्वतः वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे देखील उपस्थित आहेत. त्यामुळे ही जागावाटपाबाबतची अंतिम बैठक असू शकते.
Lok Sabha Elections : महाविकास आघाडीची निर्णायक बैठक काही वेळात सुरू होणार ! आजच्या बैठकीला प्रकाश आंबेडकरांची देखील उपस्थिती
काँग्रेसकडून ही जागा छत्रपती शाहू महाराजांना दिली जावी याच्यासाठी मागणी करण्यात आली होती. तर शिवसेना देखील या जागेसाठी हट्टला पेटली होती. पण अखेर शिवसेनेने माघार घेतली आहे आणि काँग्रेसला ही जागा देण्यासाठी कबुली दिली असून आता कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी ही छत्रपती शाहूंना देण्याचं या बैठकीमध्ये ठरल आहे. परंतु याबाबत अद्याप घोषणा झालेली नाही.