अहमदनगर : तलाठी भरती घोटाळा प्रकरणी राधाकृष्ण विखे पाटील यांनी आता थेट भूमिका घेतली आहे. खोटा प्रचार करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करणार असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. तलाठी भरती प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जातो आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणी आर्थिक घोटाळ्याचाही संशय व्यक्त करत एका जागेसाठी 25 लाख रुपयांची वसूली झाल्याचे धक्कादायक आरोप देखील केले आहेत.
नेमकं प्रकरण काय ?
राधाकृष्ण विखे पाटलांच्या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना 200 पैकी 214 गुण ते देणार का ? आणि कुणालाही डॉक्टर करणार का ? असा सवाल रोहित पवार त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच एका जागेसाठी 25 लाख रुपयांची वसूली झाल्याचे धक्कादायक आरोप देखील करण्यात आले आहेत. रोहित पवार यांच्या या आरोपांवर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
काय म्हणाले राधाकृष्ण विखे पाटील
या आरोपांवर राधाकृष्ण विखे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, जी मुलं गुणवत्ता यादीत आली त्यांच्यावर अन्याय का करायचा ? असा सवाल उपस्थित करत विनाकारण गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असून खोटा प्रचार करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करणार असल्याच राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हंटले आहे.