मुंबई : अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेला शिवसेना नेमकी कोणाची आणि आमदार अपात्रता संदर्भात 10 जानेवारीला विधानसभा अध्यक्षांनी अखेर निर्णय दिला आहे. यामध्ये शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच असून सर्व आमदार पात्र असल्याचं राहुल नार्वेकर यांनी घोषित केले. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाकडून या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात Supreme Courtयाचिका दाखल करण्यात आली आहे.
उद्धव ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या शिवसेना अपात्रता निर्णयाविरोधात दाखल केलेल्या याचिकेमध्ये नार्वेकरांनी दिलेल्या निकालाला स्थगिती देण्यात यावी ही मागणी केली आहे.
याचिकेमध्ये करण्यात आली ही मागणी
१. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या शिवसेना पक्ष कोणाचा आणि आमदार अपात्रतेबाबत दिलेल्या निर्णयाला स्थगिती देण्यात यावी अशी मागणी सुप्रीम कोर्टाकडे केली आहे.
२. शिवसेना ठाकरे गटाच्या 16 आमदारांचे अपात्रतेपासून आणि संरक्षण व्हावे.
या दोन प्रमुख मागण्यांचा याचिकेमध्ये समावेश असून विधानसभा अध्यक्ष सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामध्ये फेरफार करून न्यायालयाचा अवमान केला असल्याचा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे.