मुंबई : महाराष्ट्राच वैभव पुन्हा परत आणू असं वचन उद्धव ठाकरे यांनी आपल्या वचन नाम्यातून दिल आहे. गुरुवारी सायंकाळी शिवसेना उद्धव ठाकरे Uddhav Thackrey गटाचा वचननामा प्रसिद्ध करण्यात आला. यामध्ये विशेष करून शेतकरी आणि तरुणांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्रातून मोठे प्रकल्प हे गुजरात आणि अन्य राज्यात गेले आहेत. महाराष्ट्रावरील हा अन्याय आम्ही पूर्णपणे थांबू आणि पुन्हा महाराष्ट्राचं वैभव महाराष्ट्राला मिळवून देऊ. तसा आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिलं. त्याचबरोबर मुंबईतून आयकर सीमा शुल्क आणि अन्य करांच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या तिजोरीत दरवर्षी काही लाख कोटी रुपये जमा होतात. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधांसाठी केंद्राकडून भरीव आर्थिक तरतूद करून घेऊ. मुंबई हेच भारतातील आर्थिक केंद्र असल्याची वस्तू स्थिती सारे जग मानते. परंतु महाराष्ट्रावरील आकसापोटी आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र अहमदाबाद येथे हलवण्यात आलं. इंडिया आघाडीचे सरकार महाराष्ट्रावरील अन्याय दूर करण्यासाठी मुंबईत आंतरराष्ट्रीय आर्थिक केंद्र स्थापन करेल आणि राज्यातील तरुण-तरुणींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी कटि बद्ध राही असे यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
छत्रपती संभाजीनगर : भर सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ” लाव रे तो व्हिडिओ..! ” नेमका व्हिडिओ कोणता लावला? पहा
वचननाम्यातील ठळक मुद्दे कोणते
- ग्रामीण भागातील युवक आणि युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार
- आरक्षण आणि सामाजिक न्याय मिळवून देणार
- आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यावरून वाढवण्यासाठी आग्रह धरणार
- महाराष्ट्रात कोविड महामारीच्या काळात तात्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारने बजावलेल्या आरोग्य सेवांचे सर्व स्तरातून कौतुक झाले होते. या पार्श्वभूमीवर सर्व जिल्ह्यातील रुग्णालय आधुनिक उपकरणांनी सुसज्ज करू प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ही आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणार
- जीएसटी सुधारणार
- सत्तेचे विकेंद्रीकरण करणार संघराज्य पद्धती अधिक बळकट करणार
- शेतकरी आणि शेतीबाबत भरीव तरतूद
- उद्योग आणि व्यवसायास प्रोत्साहन
- महिलांच्या सन्मानार्थ उपाय आणि योजना
शिवसेना उद्धव ठाकरे गटाने आज हे ठळक मुद्दे घेऊन आपला वचननामा प्रसिद्ध केला आहे.