मुंबई : आमदार अपात्रता निकालानंतर राजकीय वर्तुळातून अनेक टीकाटिप्पणी झाल्या. परंतु विशेष असे की उद्धव ठाकरेंचे भाऊ आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या विषयावर कोणतेही वक्तव्य करण्याचे टाळले होते. पण आता राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली आहे. त्या म्हणाल्या की, ” ज्या माणसामुळे दिग्गजांनी पक्ष सोडला त्याच्या हातातूनच पक्ष गेला… ! “
नेमकं काय म्हणाल्या शर्मिला ठाकरे
मनसेच्या विक्रोळी महोत्सवात बोलत असताना शर्मिला ठाकरे म्हणाल्या की, ” एका वाक्यात सांगायचे झाले तर आज वर्तुळ पूर्ण झाले आहे. शिवसेनेतील ज्या दिग्गज नेत्यांना या माणसामुळे बाहेर जायला लागलं होतं, त्याच्याच हातातून पक्ष सुटला आहे. असा एक प्रकारे रोषच शर्मिला ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. तसेच सुशांत सिंह राजपूत प्रकरणामध्ये शर्मिला ठाकरे यांनी आदित्य ठाकरे याची बाजू घेतली होती. यावेळी स्वतः उद्धव ठाकरे यांनी देखील शर्मिला ठाकरे यांचे आभार मानले होते. यावर देखील भाष्य करताना त्या म्हणाल्या की, ‘ मी माझ्या पुतण्यावर विश्वास ठेवला. पण तुम्ही तुमच्या लहान भावावर विश्वास ठेवलात का ? असा सवाल त्यांनी केला आहे.
कोण आहेत शर्मिला ठाकरे
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शर्मिला ठाकरे या पत्नी आहेत. राजकारणामध्ये त्यांचा थेट सहभाग नाही. राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यामुळेच 27 नोव्हेंबर 2005 रोजी शिवसेना मधून काढता पाय घेतला होता. यावर आज शर्मिला ठाकरे यांनी रोष व्यक्त केला आहे.