सांगली : महाराष्ट्रात फुटाफुटीचे राजकारण झाल्यानंतर महाविकास आघाडी आणि महायुती दोघांमध्येही संवादाचा अभाव असल्याने जागा वाटपाचा तिढा अद्याप देखील सुटलेला नाही. तर अनेक जागा या लोकसभा निवडणुकीमध्ये प्रचंड गाजल्या आहेत. यापैकी एक नाव आहे सांगली लोकसभा मतदारसंघाच..
सांगली लोकसभा मतदारसंघांमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील हे निवडणूक लढवत आहेत. दरम्यान या उमेदवारीमुळे विशाल पाटील यांनी बंडखोरी केली आणि आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. सांगलीमधून अद्याप देखील वातावरण शांत नाहीये. अशातच आता ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी देखील एक अचंभित करणारी प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकं काय म्हणाले शरद पवार ?
सांगली लोकसभा मतदारसंघाच्या जागेबाबत माध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले की, चंद्रहार पाटील यांची उमेदवारी आम्हाला टीव्हीवरच कळाली. याबाबत चर्चा झाली नाही!
राज ठाकरेंची REEL पाहिलीत का? इन्फ्लुएन्सर अथर्व सुदामेसोबतची REEL होतेय व्हायरल, पहा व्हिडीओ
शरद पवारांच्या या वक्तव्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चेला पुन्हा एकदा उधाण आले आहे. एकीकडे आधीच या उमेदवारीवरून सांगली काँग्रेसमध्ये प्रचंड रोष पाहायला मिळत आहे. त्यात आता ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वक्तव्याने नेमकं काय घडतं हे लवकरच महाराष्ट्र पाहणार आहे.