मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता सर्वच पक्षांचा प्रचाराचा वेग एकीकडे वाढला आहे. तर दुसरीकडे अंदाज वर्तवले जात आहेत की कोणत्या पक्षाला किती जागा मिळू शकतात एकीकडे प्रसार माध्यम देखील अंदाज वर्तवत आहेत. तर दुसरीकडे पक्षप्रमुख आणि नेते मंडळी देखील आपला अंदाज वर्तवत आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी भाजप 45 च्या वर जागा घेईल असा अंदाज वर्तवला आहे. त्यांच्या या अंदाजावर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी बोचरी टीका केली आहे.
संजय राऊत म्हणाले की, ” निवडणुकीला हळूहळू रंग चढत जाईल जे सर्वे येत आहेत. त्याबद्दल आम्ही सहमत नाही आम्हाला महाराष्ट्र शंभर टक्के यश मिळेल. देवेंद्र फडणवीस जे सांगत आहेत 45 प्लस त्यांचे आकडे काहीही असू द्या त्यांना आकडे लावण्याची सवय आहे. निवडणुकीच्या नंतर त्यांना आकडे लावण्याचा धंद्यात पडावे लागेल. ” अशी भोसरी टीका संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांवर केली आहे.
Lok Sabha Elections : ” ही लढाई आपण जिंकणारच ! निवडणूक लढत फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी आणि भाजपामध्ये..! ” प्रकाश आंबेडकरांनी कार्यकर्त्यांना लिहिले पत्र
त्याचबरोबर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, ” महाराष्ट्रात इंडिया आघाडीला 35 प्लस आणि देशात 305 जागा मिळतील. मुख्यमंत्र्यांना त्यांचा उमेदवार बदलावा लागला. विद्यमान खासदाराला तिकीट देऊ शकले नाहीत. त्यामुळे त्यांना रोडशो घेऊ द्या. काहीही हातात पडणार नाही. मुख्यमंत्र्यांचा राम प्रेम खोटं आहे. कोणत्याही लढ्यात आणि संघर्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नव्हते. राम पळकुट्यांच्या मागे राहत नाही. जो आत्मविश्वासाने लढतो त्यांच्यासोबत राम असतो. ” अशी टीका त्यांनी मुख्यमंत्र्यांवर केली.