छत्रपती संभाजीनगर : 13 मे रोजी लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. दरम्यान आज सायंकाळी सहा वाजता प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून दिवसभरात महाराष्ट्रात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या घटना पाहायला मिळाल्या. यामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाल्याच समजते आहे.
आज चौथा टप्प्यातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रचाराच्या शेवटच्या दिवशी क्रांती चौकातून चंद्रकांत खैरे यांची रॅली निघणार होती. यासाठी यावेळी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि नेते देखील या ठिकाणी आले. यावेळी मोठ्या प्रमाणावर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. या घटनेवर मनसेनेते संदीप देशपांडे यांनी तीव्र शब्दात संताप व्यक्त केला आहे.
यावेळी संदीप देशपांडे यांनी विरोधकांना थेट इशाराच दिला असून ते म्हणाले की, ” आमच्या मनसैनिकांच्या नादाला कोणी लागू नये. नाही तर यांच्या पार्श्वभागाला पाय लावून पळायला लावू… यांनी हात तोडण्याची भाषा करू नये यांना तर आम्ही पळून पळून मारलं आहे. चंद्रकांत खैरे हे आऊटडेटेड नेते आहेत. सिम कार्ड नसलेला जुना मोबाईल आहे ही काय आम्हाला धमकी देणार?” असा इशारा संदीप देशपांडे यांनी दिला आहे.
बीडमध्ये राजकारण तापले : ” लोकसभा निवडणुकीमध्ये अजितदादांना स्वतःचा मुलगा निवडून आणता आला नाही..! ” बजरंग सोनवणे यांची अजित पवारांवर जहरी टीका
दरम्यान यावेळी संदीप देशपांडे यांनी संजय राऊत यांच्यावर देखील बोचरी टीका केली आहे ते म्हणाले की, ” संजय राऊत यांनी भाजपचा प्रचार केला तेव्हा ते देशप्रेमी आणि आम्ही प्रचार केला की देशद्रोही…ज्या राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल घाणेरडी वक्तव्यं केली. त्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसले आहात. संजय राऊत जेव्हा वर जातील, तेव्हा त्यांना बाळासाहेब ठाकरे चपलीने मारल्याशिवाय राहणार नाहीत. हे माझं वाक्य लिहून घ्या, अशी बोचरी टीका देशपांडे यांनी राऊतांवर केली आहे.