अमरावती : महाराष्ट्रामध्ये सर्वच प्रमुख पक्षाच्या नेते उमेदवार पदाधिकारी यांचे झंझावाती दौरे सुरू आहेत महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली आहे दरम्यान आज अमरावतीत अमित शहा आणि राहुल गांधी या दोन्हीही बड्या नेत्यांची सभा होते आहे.
एकीकडे अमित शहा हे अमरावतीच्या महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या सभेसाठी सभा घेत आहेत तर काँग्रेस नेते राहुल गांधी हे अमरावतीच्या परतवाडा येथे सभा घेत आहेत या सभेमध्ये राहुल गांधी यांनी मोठ्या घोषणा केल्या आहेत.
नेमकं काय म्हणाले राहुल गांधी
सभे मध्ये उपस्थितांना संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले कि, ” काँग्रेस पक्षाचं सरकार आल्यास देशातील कोट्यवधींना लखपती बनविण्यात येणार आहे. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात उल्लेख केल्याप्रमाणे सर्वात अगोदर महालक्ष्मी योजना लागू करण्यात येईल. त्यानुसार, देशातील गरीब कुटुंबांची यादी बनवली जाईल. प्रत्येक गरीब कुटुंबातील एका महिलेचं नाव निवडलं जाईल. त्या महिलेच्या बँक खात्यात इंडिया आघाडीचं सरकार वर्षाला 1 लाख रुपये टाकणार आहे. तर, महिन्याला 8 हजार 500 रुपये देशातील कोट्यवधी महिलांच्या बँक अकाऊंटमध्ये टाकले जाती, अशी घोषणा राहुल गांधींनी अमरावतीमधील सभेतून केली.
CM Eknath Shinde : ” बाप एक नंबरी बेटा दस नंबरी..! ” हिंगोलीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर बोचरी टीका
तुम्ही 25 अब्जाधीश बनवा, आम्ही कोट्यवधी लक्षाधीश बनवणार – राहुल गांधी
यावेळी राहुल गांधी यांनी भाजप आणि पंतप्रधान रारेन्द्र मोदींवर देखील हल्लाबोल कला आहे. राहुल गांधी म्हणाले कि, नरेंद्र मोदींनी देशातील युवकांना 2 कोटी नोकरीचं अमिष दाखवलं. मात्र, गेल्या 45 वर्षातील सर्वात मोठी बेरोजगारी भारतात आहेत. त्यामुळे, गरिबांची लेकरं नोकरीच्या शोधात भटकत आहेत. जी सुविधा देशातील श्रीमंत लोक त्यांच्या मुलांना देतात, तीच सुविधा आम्ही गरिबांच्या लेकरांना, देशातील युवकांना देणार आहोत. देशातील सर्वच पदवीधरांना आम्ही अप्रेंटीशीप देणार आहोत, अशी घोषणाही राहुल गांधींनी सोलापुरातील सभेतून केली. त्यानुसार, 1 वर्षाची नोकरी गरंटी स्वरुपात दिली जाणार आहे. खासगी, सरकारी, सार्वजनिक क्षेत्रात ही नोकरी दिली जाणार असून बँक खात्यात या नोकरीच्या माध्यमातून वर्षासाठी 1 लाख रुपयेही दिले जाणार असल्याचेही घोषणा राहुल गांधींनी केली. त्यांनी 20-25 अब्जाधीश बनवले आहेत, तर आम्ही कोट्यवदी लखपती घडवणार आहोत, असेही राहुल गांधींनी यावेळी म्हणाले आहेत.