तुळजापूर : राज्याचे मुख्यमंत्री आणि वरिष्ठ नेते हा आरक्षणाचा मुद्दा दोन ते तीन दिवसात मार्गी लावतील महाराष्ट्रामध्ये विविध कायदे तज्ञाच्या समित्या या संदर्भात अभ्यास करत आहेत त्यातूनच हा आरक्षणाचा तिढा सुटणार असल्याचं आरोग्य मंत्री डॉ.तानाजी सावंत यांनी सांगितले. तुळजापूर येथे आरोग्य विभागाच्या वतीने भाविक भक्तांसाठी महाआरोग्य शिबिर आयोजीत करण्यात आले आहे. त्या कार्यक्रमाची पाहणी करण्यासाठी आज आरोग्य मंत्री धाराशिव जिल्हा दौऱ्यावर होते.