सिंधुदुर्ग : लोकसभा निवडणुकीच्या Lok Sabha Elections पार्श्वभूमीवर आज दुसऱ्या टप्प्यातील निवडणुका महाराष्ट्रातील 8 लोकसभा मतदारसंघांमध्ये पार पडत आहेत. एकीकडे मतदान प्रक्रिया पार पडते आहे, तर दुसरीकडे प्रचार सभेला देखील वेग आले आहेत. आज नारायण राणे यांच्या प्रचारार्थ रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघांमध्ये Ratnagiri Sindhudurg Lok Sabha constituency सभेचे आयोजन करण्यात आला आहे.
नारायण राणे यांची सभा आज रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघामध्ये राजापूर येथे राजीव गांधी मैदानावर पार पडते आहे. या सभेसाठी स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे, माजी आमदार शेखर निकम, प्रमोद जठार, बाळ माने यांच्यासह महायुतीचे अनेक पदाधिकारी नेते उपस्थित राहणार आहेत.
महत्वाची बातमी : आज देशभरात दुसऱ्या टप्प्यातील एकूण 88 लोकसभा मतदार संघात मतदान प्रक्रिया पार पडणार; महाराष्ट्रात ‘या’ 8 जागेवर आज लढत
नारायण राणे यांचा सिंधुदुर्ग रत्नागिरी हा बालेकिल्ला समजला जातो. आज त्यांच्या सभेसाठी मोठ्या संख्येने महायुतीचे नेते पदाधिकारी उपस्थित आहेत. त्याचबरोबर कार्यकर्त्यांनी देखील मोठी गर्दी केली आहे. आजच्या या सभेमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय बोलतात याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागल आहे.