पुणे : लोकसभा निवडणुकीच्या Lok Sabha Election 2024 पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये आज रामदास आठवले Ramdas Athavale यांनी पत्रकार परिषद घेतली अर्थातच हे पत्रकार परिषद महायुतीच्या प्रचारासाठीच होती दरम्यान नुकत्याच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेमध्ये त्यांनी केलेल्या वक्तव्यावरून महाराष्ट्रात वादळ उठले आहे. शरद पवारांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अतृप्त आत्मा असे म्हटल्यानंतर महाविकास आघाडीतून जोरदार निषेध व्यक्त केला जातोय.
आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये रामदास आठवले यांनी आपल्या खास शैलीमध्ये महाविकास आघाडीवर टीका केली ते म्हणाले की, ” इंडिया आघाडी बिनकमी लढत आहे. राज्यात महाविकास आघाडी केवळ आरोप करत सुटले आहेत. आत्मे असतात. ते भटकत असतात. नरेंद्र मोदी गुजरातचे आहेत. दिल्लीत असले तरी त्यांचा आत्मा देशभर आहे. लोकशाही धोक्यात आहेत असं म्हणतात त्यांना माझहे प्रश्न लोकशाही धोक्यात आली असती तर मोदी मत मागायला आले असते का ? ” असा सवाल रामदास आठवले यांनी केला आहे.
महायुतीचे आज महत्त्वाचे 3 निर्णय : कल्याण आणि ठाणे लोकसभा मतदार संघावर श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांच्या नावावर शिक्कामोर्तब! उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नरेश म्हस्के झाले भावुक, वाचा सविस्तर
तसेच , ” नरेंद्र मोदी यांचा आत्मा भटकत आहे. असं संजय राऊत म्हणतात त्यांना उद्धव ठाकरे यांनी केवळ आरोप करण्यासाठी ठेवले आहे. राज्याचा खेळ खंडोबा यांनी केला आहे. जे रोज म्हणत आहेत खोके-खोके, त्यांचे सरकले आहे डोके…, !” अशा आपल्या खास शैलीमध्ये त्यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.
त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या वतीने सातत्याने जर महायुती 400 पार गेली तर संविधान बदलेल अशी टीका केली जाते आहे. यावर देखील आज रामदास आठवले यांनी वक्तव्य केलं ते म्हणाले की, ” पुणे जिल्ह्यातील चारही आणि मुंबईत 6 जागा आम्ही नक्की जिंकू. आम्ही संविधान बिलकुल बदलणार नाही गैरसमज पसरवू नका. मुस्लिम समाजातील लोकांनी देखील NDA ला पाठिंबा द्यावा. मला जरा तिकीट दिल नाही, तरी मी त्यांच्यासोबत आहे. मी राज्यसभेवर आहे. पण आम्हाला एकतरी जागा मिकावी अशी अपेक्षा होती. महायुतीच्या नेत्यांनी प्रयत्न केले असते. तर नक्की मिळाली असती. आपली राज्यसभा 2026 पर्यंत आहे त्यानंतर देखील मिळेल, असं देखील रामदास आठवले अजज म्हणाले आहेत.
पुण्यातून रामदास आठवले यांची पत्रकार परिषद Live | By Mahatalks – महाटॉक्सFacebook | Facebook