मुंबई : राज ठाकरे RAJ THAKREY हे आपल्या सडेतोड वक्तव्यासाठी ओळखले जातात. लोकसभा निवडणुका, विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच पक्ष सध्या आपली पुरेपूर ताकद लावत आहेत. अशातच आघाडी आणि युती एकत्र येऊन या निवडणुका लढवणार आहेत. पण मनसे महायुतीत सहभागी होणार का ? असा सवाल त्यांना सातत्याने विचारला जातो आहे.
दरम्यान राज ठाकरेंनी कधीही या सवालावर थेट उत्तर दिलं नव्हतं. सध्या त्यांच्या निवडणुकांच्या दृष्टीने बैठका आणि दौरे सुरू आहेत. डोंबिवलीच्या दौऱ्यावर असताना पपत्रकारांच्या या सवालाला त्यांनी थेट उत्तर देताना म्हटले आहे की, ” व्यासपीठावर दिसले म्हणून युती आघाड्या होत नसतात..! ” त्यामुळे अर्थातच राज ठाकरे यांचा एकला चलो रेचाचं नारा आहे हे स्पष्ट होतं.
सध्या राज ठाकरे आणि अमित ठाकरे देखील महाराष्ट्र मध्ये दौऱ्यावर आहेत. पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधून रणनीती आखली जाते आहे. यावेळी माध्यमाची संवाद साधताना राज ठाकरे म्हणाले की, “2019 नंतर महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झालाय. आजच्या राजकारणाकडे आपण बघतोय. पण जे भविष्यात राजकारणात येऊ इच्छितात, त्यांच्यासमोरच राजकारण काय आहे? वाहिन्यांवर लोक येऊन बोलतात, त्यांची भाषा कशी असते? शिव्या देतात, राजकारण्याची येण्याची इच्छा असलेल्या नवीन वर्गाला काय वाटेल? हेच राजकारण आहे. या अशा राजकारणाचा निर्णय महाराष्ट्राच्या जनतेने घेणं गरजेच आहे. त्यांनी वठणीवर आणलं, तरच चित्र बदलेल” असे देखील राज ठाकरे म्हणाले आहेत.