पुणे : ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांच्या 400 पार चा नारा याबाबत मोदींवर कडाडून टीका केली. ते म्हणाले की, ” नरेंद्र मोदी जर पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान झाले तर ते देशाच संविधान बदलतील या टीकेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काकांवर अर्थात शरद पवारांवर टीका केली आहे.
पुण्यामध्ये प्रसिद्धी माध्यमांशी बोलत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, ” लोकशाहीत कुणी कुणाचं काम करायचं तो ज्याचा त्याचा अधिकार आहे. पण देश आज पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली पुढे जात आहे. मात्र काही लोक गैरसमज पसरवतात जर 2024 मध्ये मोदी सरकार आलं तर ते देशाची राज्यघटना बदलतील असं काहीही म्हटलं जात आहे. पण तसं काही होणार नाही. असं थेट आश्वासनच अजित पवारांनी दिल आहे.
पुण्यातील लोकसभा निवडणुकीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्याबाबत देखील पुण्यात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केलं. ते म्हणाले की, ” मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी पुण्यातून देण्यात आली आहे. त्यांना संसदेत पाठवण्याचं काम तुम्हाला करायचं आहे. एकंदरीत राजकीय कल बघता मुरलीधर मोहोळ चांगल्या मतांनी निवडून येण्यास काही अडचण येणार नाही. ही निवडणूक देशाचं भवितव्य ठरवणारी आहे. काही लोक दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. महायुतीच्या माध्यमातून आम्ही काम करतोय. महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास कसा होईल हे बघतोय. ” असे यावेळी अजित पवार म्हणाले आहेत.