मुंबई : सध्याच राजकारण आणि राजकारणाची पातळी, राजकारण्यांची भाषा हे सगळंच नेते मंडळींनी उध्वस्त करून ठेवल आहे. कारण सध्याच्या लोकसभा निवडणुकीमध्ये एकमेकांच्या कामकाजाविषयी बोलण्यापेक्षा एकमेकांच्या वैयक्तिक आयुष्यावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीकाटिप्पणी केली जाते आहे. खरंतर आता मतदाता देखील सावध झाला आहे.
सुप्रिया सुळे यांचे अजित पवारांना बॉलीवूड स्टाईलमध्ये प्रत्युत्तर; ” प्यार से मांगा होताना तो सबकुछ देते…!” नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे, वाचा सविस्तर
तर नेमकं घडलं असं की, शिवसेना प्रवक्ता आणि राज्यसभेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांना अत्यंत बोचऱ्या भाषेत बॉलिवूडचा डायलॉग मारून दुखावण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी त्या म्हणाल्या की, ” मेरा बाप गद्दार है..!” असं श्रीकांत शिंदेंनी काळावर लिहावं. यावर आता एकंदरीतच शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून प्रत्युत्तर येणारच होतं. पण ते देखील बॉलीवूड स्टाईलमध्येच आल आहे हे विशेष…
ऑक्सफर्ड ॲस्ट्राझेनेकाने जगभरातून परत मागवल्या कोरोना प्रतिबंधक लस; सिरम इन्स्टिट्यूटने मान्य केले कोविशील्डचे दुष्परिणाम
यावर शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या प्रवक्त्या शितल म्हात्रे यांनी देखील प्रत्युत्तर दिल आहे. त्या म्हणाल्या की, ” काँग्रेसमधून मागच्या दाराने खासदार होण्यासाठी उबाठात आलेल्या लाचार ‘चतुर’ ताई आम्हाला ‘मराठी अस्मिता’ शिकवणार?. जन्म महाराष्ट्रात होऊनसुद्धा एवढ्या वर्षात तुम्हाला मराठी भाषा येत नाही, ना नीट बोलता. लिहून पण आता हे दुसऱ्याकडून घेतलय ज्यात असंख्या चुका, यापेक्षा दुर्दैव ते काय?, असा सवाल शितल म्हात्रे यांनी विचारला होता. तसेच, बाकी जाऊ दे, दाओसला कशाला गेलेलात? आणि मागच्या आठवड्यात तुम्ही कुठे मुजरे करुन हुजरेगिरी केलात, ते आधी सांगा, असे प्रश्नही म्हात्रे यांनी प्रियंका चतुर्वैदींना विचारले आहेत. तसेच, ”बुलंदी सिनेमातला एक डायलॉग आहे, ‘बिल्ली के दात गिरे नहीं और चली शेर के मूह में हाथ डालने’ अशीच काहीशी परिस्थिती प्रियंका चतुर्वेदी यांची झाली आहे. तुमचा काही संबध नसताना डावोसला जाऊन गुलाबी थंडीत काय केले, हे ही प्रियंका चतुर्वेदी यांनी लोकांना सांगितले पाहिजे” असं शीतल म्हात्रे म्हणाल्या. ”पुन्हा खासदारकी मिळवण्यासाठी गेल्या आठड्यात कोणाकोणाला भेटलात आणि स्वत:जवळ आदित्य ठाकरेंचे कसे फोटोग्राफ आहेत, हे दाखवून तरी मला खासदारकी द्या, असे सांगणाऱ्या प्रियंका चतुर्वेदी यांनी बोलताना विचार करावा आणि भान ठेवावे” असा जोरदार शाब्दिक प्रतिहल्ला म्हात्रे यांनी केला आहे.