मुंबई : सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी PM Narendra Modi हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. महाराष्ट्रभर त्यांचे झंझावाती सभा सुरू आहेत. यामध्ये ते अनेक नेत्यांवर कठोर शब्दात टीकाही करत आहेत. पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाळासाहेबांबाबत बोलताना अनेक गोष्टींबाबत खुलासा केला आहे.
टीव्ही ९ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ” शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आपल्यावर मोठे ऋण आहे. माझ्यावर त्यांचे खूप प्रेम होते. ते प्रेम तो स्नेह मी विसरू शकत नाही.” अशा शब्दात त्यांनी त्यांची आठवण काढली.
या मुलाखतीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रश्न विचारण्यात आला होता की, ” बाळासाहेब ठाकरे यांचे उत्तरअधिकारी म्हणून तुम्ही उद्धव ठाकरे यांना मानता का ? ” यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ” ते त्यांचे पुत्र आहेत हे वेगळं सांगण्याची गरज नाही. पण माझे त्यांच्या कुटुंबासोबत चांगले संबंध राहिलेले आहेत. जेव्हा बाळासाहेब आजारी होते तेव्हा मी त्यांच्या घरी फोन केला. मी नियमितपणे फोन करून वहिनींना विचारत असे, बाळासाहेबांवर शस्त्रक्रिया करण्याआधी देखील मला फोन करण्यात आला होता. आणि माझं मत विचारलं गेलं होतं.” अशी आठवण यावेळी पंतप्रधानांनी सांगितले आहे.
मोठी बातमी : जयंत पाटलांना मुंबईत सोडून सुषमा अंधारेंना घ्यायला जात असणार हेलिकॉप्टर कोसळलं ! सुषमा अंधारे यांच्या डोळ्यादेखतचं…
तसेच यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, बाळासाहेबांचे पुत्र म्हणून मी उद्धव ठाकरेंचा सन्मान करणारच , ते काही माझे शत्रू नाहीत. उद्या समस्या निर्माण झाली त्यांना मदत करणारी पहिली व्यक्ती मी असेल, पण परिवार म्हणून बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा मुद्दा आहे. त्यासाठी मी समर्पित आहे. बाळासाहेबांचे माझ्यावर अतिशय प्रेम होते. मी ते प्रेम कधीही विसरू शकत नाही. आज आमच्याकडे जास्त आमदार आहेत. तरीही आम्ही शिवसेनेचा मुख्यमंत्री केला, ही बाळासाहेब ठाकरेंना माझ्या वतीने वाहिलेली श्रद्धांजली आहे. ” असं देखील यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.