मुंबई : पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी मोठी बातमी समोर येते आहे. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी प्रवीण राऊत यांची 73.65 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. आतापर्यंत या प्रकरणांमध्ये 116.27 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. प्रवीण राऊत हे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळे संजय राऊतांना हा मोठा धक्का मानला जातो आहे.
आजची ही मोठी बातमी समोर येत असून मुंबईतील गोरेगाव येथील पत्राचा म्हाडाचा भूखंड आहे. या ठिकाणी प्रवीण राऊत यांच्या कंपनीला कन्स्ट्रक्शन करण्याचं काम दिलं होतं. पण त्याचा काही भाग हा खाजगी बिल्डर्स ना विकल्याचा थेट आरोप त्यांच्यावर झाला होता.
यामध्ये एकूण तीन हजार फ्लॅट बांधायचे होते. त्यापैकी 672 फ्लॅट भाडे करून आणि उरलेले म्हाडा आणि विकासक यांना मिळणार होते. परंतु प्रवीण राऊत यांनी कंपनीचे 25% शेअर एचडीआयएला विकले. तसेच भूखंडाचा काही भाग इतर खाजगी बिल्डर्सना हस्तांतरित केला असा आरोप त्यांच्यावर आहे. याप्रकरणी आता प्रवीण राऊत यांच्यासह इतर भागीदारांची पालघर, दापोली, रायगड आणि ठाणे येथील जमिनी जप्त करण्यात आल्या आहेत.