मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रोज नवीन खळबळजनक राजकीय घटना घडते आहे. अशातच आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर Prakash Ambedkar यांनी एक खळबळजनक गौव्यस्फोट केला आहे. ते म्हणाले की, महाविकास आघाडीने भाजपसोबत वीस जागेचे फिक्सिंग केले आहे. त्यांच्या या वक्तव्याने एकच खळबळ उडाली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागा वाटपावरून आरोप प्रत्यारोप आणि नाराजी नाट्य सुरू आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे घडतच असते. हे जरी खरं असलं तरी आता प्रकाश आंबेडकर यांनी केलेला हा गौप्य स्फोट राजकीय वर्तुळात एक मोठा भूकंप आणणारा ठरू शकतो.
Nashik : ” कमळ चिन्हावर निवडणूक लढणार असल्याची चर्चा निरर्थक ! ” छगन भुजबळ यांनी स्पष्ट सांगून टाकलं
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. यावेळी त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर भाष्य केले आहे. ते म्हणाले की, कल्याण, बीड, बुलढाणा सह वीस जागांवर महाविकास आघाडीने भाजपसोबत फिक्सिंग केले आहे. तसेच यावेळी कोल्हापुरातून संजय मंडलिक यांनी शाहू महाराज छत्रपती यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचा देखील कडाडून निषेध केला आहे. ते म्हणाले की, ” शाहू महाराज कोण आहे ? त्यांचं कुटुंब कोण आहे ? त्यांच्या जवळच्या कुटुंबातील माणसं कोण आहे ? हे जगानं मान्य केला आहे. त्यामुळे त्यावर दोन गाढवांनी कमेंट केल्यावर आपण त्यावर कमेंट करावं असं मला वाटत नाही. अशी भूमिका त्यांनी मांडली. तर या निवडणुकीवर मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी हे दोन फॅक्टर देखील मोठा परिणाम करणार असं देखील भाकीत त्यांनी केल आहे.
रामेश्वरमच्या कॅफेत झालेल्या ब्लास्ट मागचा मास्टरमाईंड NIA च्या जाळ्यात अखेर अडकलाच; बॉम्ब पेरणारा आणि कट रचणारा दोघेही गजाआड
महाविकास आघाडी आणि भाजपबाबत केलेल्या या गौप्यस्फोटानंतर आता महाविकास आघाडीतील प्रमुख नेते आणि भाजप यावर काय प्रतिक्रिया देते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.









