बीड : लोकसभा निवडणुका प्रचंड गाजल्या आहेत. भाजपच्या दिग्गज नेत्यांना देखील हार पचवावी लागते आहे. एकीकडे भाजप BJP नेमका महाराष्ट्रात एवढा मोठा फटका कसा बसला ? याच आत्मचिंतन करत असतानाच बीडमध्ये मात्र परिस्थिती बिघडली आहे.
बीड लोकसभा मतदार संघाचा निकाल यावर्षी अत्यंत धक्कादायक लागला आहे असंच म्हणावं लागेल. कारण अनेक वर्षांपासून मुंडे कुटुंबीयांचं वर्चस्व असणाऱ्या या लोकसभा मतदारसंघांमध्ये बजरंग सोनवणे यांनी बाजी मारली आहे. तर भाजपच्या दिग्गज नेत्या पंकजा मुंडे यांना हार पत्करावी लागली आहे. ही लढाई प्रचंड चुरशीची ठरली. परंतु मराठा आंदोलनामुळे या लोकसभा मतदारसंघाला सर्वात जास्त मोठा फटका बसला आहे. दरम्यान चार जून रोजी लोकसभा निवडणुकीचे निकाल घोषित करण्यात आले. यावेळी या धक्कादायक निकालानंतर सोनवणे समर्थकांनी एकच जल्लोष केला. जो सहाजिकच होता परंतु यापैकी एकानं सोशल मीडियावर थेट काही तरुण आनंद साजरा करत असतानाचा व्हिडिओ टाकून या व्हिडिओ खाली आक्षेपार्ह मजकूर लिहिला. यावरून पंकजा मुंडे यांचे समर्थक प्रचंड प्रमाणात चिथवले गेले आणि हे प्रकरण आता चिघळले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गणेशपार भागात राहणाऱ्या गणेश सावंत या युवकान फेसबुकवर ही आक्षेपार्ह हो पोस्ट लिहिली. यानंतर संबंधित तरुणावर गुन्हा दाखल करण्याची मागणी मुंडे समर्थकांनी केली होती. दरम्यान आज पंकजा मुंडे यांचे समर्थक थेट शिरापूर येथील या पोस्ट लिहिणाऱ्या युवकाच्या घरी पोहोचले. ही माहिती मिळताच पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेऊन एकंदरीत परिस्थिती नियंत्रणात ठेवली असली तरी वातावरण मात्र तापलेलेच आहे. दरम्यान आज सकल ओबीसी समाज आणि सकल वंजारी समाजाच्या वतीने पाथर्डी बंदची हाक देण्यात आली आहे.