मुंबई : भुजबळांच्या राजीनाम्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. अहमदनगरमध्ये ओबीसी आरक्षण OBC Reservation बचाव एल्गार मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यामध्ये मंत्री छगन भुजबळ Minister Chhagan Bhujbal यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देत असल्याचं सांगून खळबळ उडवली.
विशेष म्हणजे मंत्री छगन भुजबळ यांनी स्व-पक्षालाच घरचा आहेर शाल जोडीत द्यायला सुरुवात केली. तसेच ट्विट देखील त्यांनी केले आहे. छगन भुजबळ म्हणाले की, ” अडीच महिने मी शांत राहिलो. 16 नोव्हेंबरलाच मी मंत्री मंडळाचा राजीनामा देऊन सभेला गेलो होतो. मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्री यांनी सांगितले वाच्यता नको ! या वक्तव्यामुळे देखील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलय.
भुजबळांनी नेमकं काय ट्विट केलं
दरम्यान छगन भुजबळ यांनी त्यांच्या राजीनाम्यानंतर रविवारी रात्री एक ट्विट केले आहे. ज्यामध्ये त्यांनी कॅप्शन दिले आहे की,
“अहमदनगरच्या ओबीसी आरक्षण बचाव एल्गार मेळाव्यातून पुन्हा एकदा आपण सरकारच्या बेबंध शाही विरोधात भेदभावा विरोधात आणि राज्यातील ओबीसी बांधवांच्या हक्कासाठी आवाज उठवला हा मेळावा म्हणजे भविष्यातील एका मोठ्या क्रांतीची बिजे ठरवणार आहे.”
भुजबळांच्या या भूमिकेनंतर राजकीय वर्तुळातून चर्चेला उधाण आलेच आहे. तर भुजबळांचा राजीनामा स्वीकारू नये अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. त्यामुळे आता पुढे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हा राजीनामा स्वीकारतात की नाकारतात याकडे सर्वांचे लक्ष लागल आहे.
Kankavali : ” त्याची दाढी खेचून…! ” उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्र्यावर थेट शब्दात टीका, वाचा नेमकं काय म्हणाले…