नाशिक : नाशिकमधून NASHIK राष्ट्रवादी काँग्रेस रोजच काही ना काहीतरी राजकीय उलथापालथ सुरूच आहे. लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवाराची चाचपणी जशी सुरू झाली त्या दिवसापासून नाशिकमधलं राजकीय वातावरण तापलेलंच आहे. हे वातावरण तापलं ते दोन नावांमुळे, ही दोन नाव आहेत मंत्री छगन भुजबळ आणि विद्यमान खासदार हेमंत गोडसे…
झालं असं की, नाशिकच्या जागेवर मंत्री छगन भुजबळ यांनी आपला दावा सांगितला. तर विद्यमान खासदार देखील तेवढ्याच त्वेषाने नाशिकच्या जागेसाठी आग्रही आहेत. परंतु जागावाटपाच्या तिढ्यामध्ये नाशिकच्या जागेचा तिढा महायुतीला अद्याप देखील सुटलेला नाही. अजून सुद्धा नाशिकच्या जागेवर उमेदवार नेमका कोण ? हे न ठरल्यामुळे मंत्री छगन भुजबळ यांनी आपला आग्रह सोडला. विरोधी पक्षाने आपला उमेदवार घोषित करून तीन आठवड्यापासून त्या उमेदवाराचा जोरदार प्रचार नाशिकमध्ये सुरू असताना महायुतीने मात्र अद्याप आपला उमेदवारच निश्चित केला नाही. असं कारण देऊन मंत्री छगन भुजबळ यांनी माघार घेतली. त्यामुळे आता विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनाच उमेदवारी मिळणार असं जवळपास निश्चित असतानाच आता तिसऱ्याच उमेदवाराच्या नावावर शिक्का मोर्तब होण्याची शक्यता असल्याचं राजकीय वर्तुळात बोलले जाते आहे.
” सकाळी येणाऱ्या मतदारांना ना उमेद करणं हे निवडणुकीच्या यंत्रणेत मोदीकृत भाजपच षडयंत्र ! ” संजय राऊत यांचा गंभीर आरोप
नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी सध्या माणिकराव कोकाटे या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. कोण आहेत माणिकराव कोकाटे ?
- माणिकराव कोकाटे हे सिन्नरचे आमदार आहेत
- राष्ट्रवादीकडून लोकसभेच्या मैदानात त्यांना उतरवलं जाणार असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.
एकंदरीतच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने पुन्हा एकदा नाशिकच्या जागेवर आपला दावा सांगितला आहे. आणि आपला पुढचा पत्ता आता टाकला गेला आहे. एकंदरीतच आता महायुती यावर काय निर्णय घेते हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.