मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार Sharad Pawar गटाला निवडणूक आयोगाने Election Commission अखेर चिन्ह प्रदान केले आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने केलेल्या विनंतीनुसार तुतारी वाजवताना माणूस हे चिन्ह दिले आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अजित पवारांनी काकांशी बंड करून भाजपशी हात मिळवणी केली. त्यानंतर सहा फेब्रुवारीला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला निवडणूक आयोगाने भिंतीवरील घड्याळ हे चिन्ह बहाल केले. शरद पवार गटाला हा मोठा धक्का होता. त्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला तुतारी वाजवताना माणूस (तुतारी) हे चिन्ह दिले आहे.
मोठी बातमी : राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन; वयाच्या 87 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास