मुंबई : आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या NCP आमदारांच्या सुनावणीचा निकालाबाबत विधानभवनात सुनावणी पार पडली आहे. या सुनावणीमध्ये विधानसभा अध्यक्षांकडून नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. दरम्यान दोन्ही गटांची संमती घेऊन सुप्रीम कोर्टाकडे विधिमंडळाकडून मुदतवाढ मागितली जाऊ शकते.
काय म्हणाले विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर
दोन्हीही गटांच्या बाजू योग्य पद्धतीने मांडायच्या असतील तर वेळापत्रकात बदल करावा लागेल असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटलं आहे. दरम्यान आज नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आलं असून पुढील सुनावणी ही 23 जानेवारीला होणार आहे. यावेळी उर्वरित चार जणांची उलट तपासणी होणार असून 25 जानेवारीला साक्षीदारांची साक्ष नोंदवली जाणार आहे. तर 29 आणि 30 जानेवारीला दोन्हीही गट आपली अंतिम बाजू मांडणार आहेत. 31 जानेवारीला ही सुनावणी पूर्ण होऊन पुढच्या दहा ते पंधरा दिवसात मी माझा निर्णय देईल असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले आहे.