नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीमध्ये Lok Sabha Elections भाजपला BJP यंदा अपेक्षेप्रमाणे यश मिळवता आले नाही. तरीही NDA ने मात्र बहुमत मिळवले आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला 240 तर एनडीएला 293 जागा मिळाल्या आहेत. देशांमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी 272 एवढे बहुमत आवश्यक आहे. त्यामुळे आता एनडीएने पंतप्रधान नरेंद्र मोदी Prime Minister Narendra Modi यांना पुन्हा एकदा एनडीएच्या नेतेपदी निवडले आहे. तरी येत्या 9 जूनला नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहे.
https://www.facebook.com/share/v/xDRErQCrVWZ5xwDC/?mibextid=qi2Omg
विशेष म्हणजे या बैठकीसाठी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना देखील मंचावर स्थान देण्यात आल आहे. आज संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये ही बैठक पार पडत असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे देखील उपस्थित आहे. यासह बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू आणि एनडीएचे घटक पक्षांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित आहेत.
दरम्यान आज या बैठकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हॉलमध्ये आल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम देशाच्या संविधानाला नमन केले. यावेळी भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी नरेंद्र मोदी यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं आहे.