अकोला : लोकसभा निवडणुकीच्या Lok Sabha Elections पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय नेते हे महाराष्ट्रभर दौऱ्यावर आहेत. दरम्यान आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले NANA PATOLE हे अकोल्यामध्ये आहेत. अकोल्यातील त्यांच्या विधानाने आज राजकीय वर्तुळात चर्चेला नवीन विषय दिला आहे. आज त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांना परत येण्याची थेट ऑफर दिली आहे. ते म्हणाले की, ” प्रकाश आंबेडकर आणखी रस्ते बंद झाले नाहीत. मी पुढाकार घेतो, तुमच्या भूमीत येऊन सांगतो, नामांकन मागे घेईपर्यंत वेळ आहे. किती जागा पाहिजे ते सांगा ? दोन-तीन किती पाहिजे ते सांगा ? पण भाजपला पराभूत करण्यासाठी समोर या. अर्ज मागे घेण्याच्या दिवसापर्यंत वेळ आहे. मग पुढची लढाई सुरू होईल. मैदान सुरू झालं तर खूप मुद्दे आहेत असं अकोल्यामध्ये भाषणा दरम्यान ते म्हणाले आहेत.
महाविकास आघाडी सोबत सुरुवातीला प्रकाश आंबेडकर हे सामील होणार होते. परंतु जागा वाटपाच्या आणि मान अपमानाच्या नाट्यानंतर अखेर प्रकाश आंबेडकर यांनी स्वबळावर निवडणुका लढवण्याचे ठरवले. त्यानंतर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांनी आपले उमेदवार देखील जाहीर केले आहेत. दरम्यान अद्याप देखील काँग्रेसकडून त्यांना खास ऑफर दिली जाते.
एकीकडे प्रकाश आंबेडकर हे आता स्निस्वबळावर निवडणुका लढवण्यावर ठाम आहेत. निवडणुका स्वबळावर लढवायच्या अशी आता त्यांची भूमिका असताना अकोल्यामध्ये नाना पटोले यांच्या वक्तव्याने महाविकास आघाडीमध्ये देखील चलबिचल सुरू झाली आहे. किती जागा हव्या ते सांगा. तुम्ही म्हणता नाना पटोलेला अधिकार नाहीत. मी स्वतःच्या बळावर सांगतो की सोबत या, पक्षश्रेष्ठींशी मी बोलेल प्रकाश आंबेडकर जी अद्याप वेळ गेलेली नाही. 2014 आणि 2019 या दहा वर्षाच्या कालावधीत मतांचं मोठं विभाजन झालं होतं. फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात मतांचे विभाजन करण्याचे षडयंत्र भाजपने नेहमीच रचलं आहे. असं यावेळी नाना पटोले म्हणाले आहेत.