नवी दिल्ली : काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी Congress leader Priyanka Gandhi मोठ्या अडचणीत सापडन्याची दात शक्यता आहे. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी आपल्या आरोपपत्रात प्रियांका वाड्रा यांचे देखील नाव घेतले आहे. ईडीने या प्रकरणात रॉबर्ट वड्रा यांच्यावर आरोप केले आहेत. ईडीने म्हटले आहे की, 2006 मध्ये प्रियांका आणि रॉबर्ट वड्रा यांनी दिल्लीतील रिअल इस्टेट एजंट एच. एल. पाहवा यांच्याकडून हरियाणातील फरिदाबाद येथे पाच एकर शेतजमीन खरेदी केली आणि फेब्रुवारी 2010 मध्ये तीच जमीन विकली.
सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आपल्या आरोपपत्रात पहिल्यांदाच काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांचे नाव घेतले आहे. एजंट पाहवा ही तीच व्यक्ती आहे ज्याने एनआरआय व्यावसायिक सीसी थंपी यांना ही जमीन विकली होती. अन्य संबंधित प्रकरणात
कोण आहे संजय भंडारी
संजय भंडारी हा फरार शस्त्र व्यापारी आहे, ज्याची एजन्सी मनी लाँड्रिंग प्रतिबंधक, परकीय चलन आणि काळा पैसा कायद्यांचे उल्लंघन आणि ऑफिशियल सीक्रेट अॅक्टअंतर्गत चौकशी देखील सुरु आहे. भंडारी २०१६ मध्ये भारतातून ब्रिटनला पळून गेला होता. थंपी यांच्यावर ब्रिटिश नागरिक सुमित चढ्ढा यांच्या संगनमताने भंडारी यांना काळा पैसा लपविण्यास मदत केल्याचा आरोप आहे.
ईडीने या प्रकरणाशी संबंधित आपल्या पहिल्या आरोपपत्रात रॉबर्ट वाड्रा यांना थंपी यांचे निकटवर्तीय म्हणून नाव दिले आहे. ताज्या आरोपपत्रात पाहवा यांना भूसंपादनासाठी हिशेब पुस्तिकेतून रोख रक्कम देण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. रॉबर्ट वाड्रा यांनी पाहवा यांना विक्रीचे पूर्ण पैसे दिले नसल्याचेही निदर्शनास आले. या प्रकरणी ईडीचा तपास अजूनही सुरू आहे.
मनी लॉन्ड्रिंगच्या आणखी एका प्रकरणात रॉबर्ट वाड्रा अडकण्याची शक्यता आहे. त्यांची कंपनी स्काय लाइट हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड आणि इतरांची चौकशी सुरू आहे. या प्रकरणात असे आढळले आहे की, दिल्ली एनसीआरमधील रहिवासी महेश नागर यांनी रॉबर्ट वाड्रा यांच्या विविध संस्थांच्या नावे दिल्ली-एनसीआर आणि राजस्थानमध्ये जमीन खरेदी केल्या आहेत. या प्रकरणाची देखील चौकशी होऊ शकते.