मुंबई : दीड वर्षानंतर आज अखेर शिवसेनेतील त्या बंडखोरीवर MLA Disqualification Case निर्णय होणार आहे. हा निकाल ऐकण्यासाठी महाराष्ट्रच नाही तर देशभरातून राजकीय व्यक्तिमत्वापासून ते सामान्यांपर्यंत सर्वांनी कान टवकारले आहेत. आज चार वाजता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी निकाल घोषित करणार आहेत.
आज बुधवारी चार वाजता हा निकाल घोषित केला जाणार असून कालपासूनच राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे. काल देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या भेटीमुळे देखील निकालापूर्वीच तर्क-वितर्क लढवले जात आहेत.
इथे पहा थेट प्रक्षेपण :
आजच्या या निकालाच वाचन चार वाजता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे करणार आहेत. 34 याचिकांचे ६ गटात समावेश करून त्यानुसार आता सहा गटात हा निकाल वाचला जाणार आहे. दोनशे पानांचा एक निकाल असून बाराशे पानांचे हे निकाल पत्र आहे. या निकालाच्या नंतर महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड उलथापालक तर होणार आहेचं. देशातील राजकीय परिस्थितीवर देखील या निकालाचा परिणाम होऊ शकतो असं राजकीय तज्ञांचं मत आहे.
शिंदे गटाच्या ‘या’ आमदारांवर आज निर्णय :
1) एकनाथ शिंदे (मुख्यमंत्री)
2) चिमणराव पाटील
3) अब्दुल सत्तार
4) तानाजी सावंत
5) यामिनी जाधव
6) संदीपान भुमरे
7) भरत गोगावले
8) संजय शिरसाठ
9) लता सोनवणे
10) प्रकाश सुर्वे
11) बालाजी किणीकर
12) बालाजी कल्याणकर
13) अनिल बाबर
14) संजय रायमूळकर
15) रमेश बोरनारे
16) महेश शिंदे
शिवसेना ठाकरे गटाच्या ‘या’ आमदारांवर आज निर्णय :
1) अजय चौधरी
2) रवींद्र वायकर
3) राजन साळवी
4) वैभव नाईक
5) नितीन देशमुख
6) सुनिल राऊत
7) सुनिल प्रभू
8) भास्कर जाधव
9) रमेश कोरगावंकर
10) प्रकाश फातर्फेकर
11) कैलास पाटिल
12) संजय पोतनीस
13) उदयसिंह राजपूत
14) राहुल पाटील