मुंबई : शिवसेना आमदार अपात्रता (MLA Disqualification Case) प्रकरणी आजपासून सलग पाच दिवस सुनावणी होणार आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू (Sunil Prabhu) यांची साक्ष अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यामुळे आज त्यांच्या साक्षीने कामकाजाला सुनावणी सुरु होईल. 28, 29 आणि 30 नोव्हेंबरला सलग तीन दिवस आमदार सुनील प्रभू यांची उलट साक्ष होणार आहे. अॅड. महेश जेठमलानी पुढचे तीन दिवस सुनील प्रभूंची उलट साक्ष घेणार आहे. तसेच शिवसेना कार्यालय कर्मचांऱ्याची उलट साक्ष होणार आहे.
हे वाचलेत का ? Uttarkashi Tunnel Rescue Update : अखेर बोगद्यात अडकलेल्या 41 मजुरांना बाहेर काढण्याचे काम अंतिम टप्प्यात
PHOTO
आमदार अपात्रता सुनावणी दरम्यान, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुनावणीच्या गतीवरून नाराजी व्यक्त केली होती. राहुल नार्वेकर म्हणाले कि, फक्त 16 दिवस माझ्याकडे या सुनावणीसाठी आहे. त्यात हे प्रकरणाची सुनावणी संपवून निर्णय घ्यायचा आहे, मला 31 डिसेंबरपर्यंत या प्रकरणांची सुनावणी संपवायची आहे. सार्वजनिक सुट्ट्या आणि अधिवेशन कालावधी वगळता माझ्याकडे या प्रकरणाची सुनावणी पूर्ण करण्याकरिता फक्त 16 दिवसाचा कालावधी आहे असल्याचे त्यांनी दोन्ही पक्षकारांना सांगितले होते. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी आज सुनावणीचे वेळापत्रक जाहीर केले.
आमदार अपात्रता सुनावणीचे असे आहे वेळापत्रक?
शिवसेना आमदार आपत्रता प्रकरण सुनावणी 18 दिवसांमध्ये चालणार आहे. विधानसभा अध्यक्षांनी सुनावणीच्या तारखा दोन्ही गटासमोर वाचून दाखवल्या. पुढील सुनावणी तारखा –
28, 29 आणि 30 नोव्हेंबर
1, 2, 5, 6 आणि 7 डिसेंबर
11 ते 15 डिसेंबर सलग सुनावणी
18 ते 22 डिसेंबर सलग सुनावणी