मुंबई : लोकसभा निवडणुका जशा जाहीर झाल्या तेव्हापासून मुंबईतील सहा जागा जिंकून येण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडी प्रचंड ताकद लावत आहेत. राजकीय खेळी खेळल्या जात आहेत. अशातच मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात देखील आज एक नवीन मोठी घडामोड झाली आहे. एमआयएम MIM पक्षाने देखील आता या लोकसभा मतदारसंघांमध्ये आपला उमेदवार जाहीर केला आहे.
आज अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून रमजान चौधरी यांनी एमआयएम पक्षाकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
एकंदरीतच ही लढत आता महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेसकडून वर्षा गायकवाड विरुद्ध महायुतीकडून भाजपच्या वतीने उज्वल निकम विरुद्ध एमआयएमच्या वतीने रमजान चौधरी अशी होणार आहे.
शिवसेना ठाकरे गटाची मोठी खेळी ! कल्याण लोकसभा मतदार संघातून आणखीन एका उमेदवाराची एन्ट्री; कोण आहे हा उमेदवार? वाचा सविस्तर
खरंतर महाविकास आघाडीच्या वतीने मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात नसीम खान यांना उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु काँग्रेसने त्यांचं तिकीट कापून वर्षा गायकवाड यांना दिलं. त्यामुळे नसीम खान आणि मुस्लिम समाज हा नाराज आहे. त्यामुळे भाजपला याचा फायदा होऊ शकणार होता. परंतु आता आपली उमेदवारी घोषित केल्यानंतर आता इथे होणारी ही तिरंगी लढत चुरशीची होणार यात शंका नाही.