मुंबई : अनेक महिन्यांच्या लढ्यानंतर आज अखेर मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या राज्य सरकारने मान्य केले आहेत. आजपर्यंत कायद्याच्या कसोटीत बसणार आरक्षण मराठा समाजाला दिले जाईल, तसेच मराठा समाजाला दिल्या जाणाऱ्या आरक्षणामुळे ओबीसी समाजाच्या आरक्षणास धक्का बसणार नाही, असे राज्य सरकार म्हणत होते. परंतु आज तसे न होता मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार सरसकट आरक्षण मान्य करण्यात आला आहे.
खरंतर ओबीसी समाज यावर आक्रमक भूमिका घेणार यात शंका नव्हती आणि घडतही तसंच आहे. ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाले आहे की, मराठा आरक्षणाबाबत सरकारने दिलेल्या अध्यादेशाची आम्ही होळी करून राज्यभर आक्रोश आंदोलन करू ओबीसींसाठी नवा पक्ष उभारू असे प्रकाश शेंडगे म्हणाले आहेत.
छगन भुजबळांचा राज्य सरकारला घरचा आहेर; ” तो अध्यादेश नसून अध्यादेशाचा मसुदा, सगेसोयरे हे कायद्याच्या कसोटीवर टिकणार नाही..! ” नेमकं काय म्हणाले भुजबळ वाचा सविस्तर
नेमकं काय म्हणाले ओबीसी नेते प्रकाश शेंडगे
माध्यमांशी बोलताना प्रकाश शेंडगे म्हणाले कि, “मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण मिळालं आहे. 100 टक्के मराठा समाजाला कुणबी दाखले देऊन ओबीसीमध्ये घ्यायचा जरांगे पाटील आणि सरकारचा प्रयत्न यशस्वी झाला असं दिसत आहे. पण यात खरंच मराठा समाजाचा फायदा की तोटा? दूध का दूध पाणी का पाणी लवकरच होईल. आता ओबीसी आरक्षणाचं वर्गीकरण आणि विभाजन होईल. जो कुणबी दाखला घेईल तो पुन्हा मराठा होऊ शकत नाही. तुम्ही पुन्हा 96 कुळी मराठा म्हणून घेऊ शकत नाहीत. कुणबी दाखल झाला की राज्यातील मराठा समाजाच्या जमातीचे अस्तित्व संपुष्टातील राज्यात मराठा समाज उरणार नाही. आता कुणबी की तू का मेळवावा असं करावं लागेल”, अशी संतप्त प्रतिक्रिया प्रकाश शेंडगे यांनी व्यक्त केली आहे.