मुंबई : मराठा आरक्षण हा मुद्दा आता चांगलाच चिघळला आहे. मराठा आरक्षणासाठी ठिकठिकाणी आंदोलनं उपोषणं होत असतानाच मुंबईत मंत्रालयाच्या गेटवर सर्वपक्षीय आमदारांनी आंदोलन सुरु केले आहे. आज तिसऱ्या दिवशी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमदारांनी आंदोलन केले. या आंदोलनकर्त्या आमदारांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
https://www.instagram.com/reel/CzIm4OYpv8Q/?utm_source=ig_web_copy_link
मराठा आरक्षणासाठी सर्वपक्षीय आमदारांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या आमदारांनी मंत्रालय परिसरात आंदोलन केलं.मंत्रालयाला या आमदारांकडून रास्ता रोको करण्यात आला आहे. मात्र हा अतिशय संवेदनशील परिसर आहे. तसेच जवळ वानखेडे स्टेडियममध्ये भारत आणि श्रीलंकेचा सामना आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिसांनी आमदरांना ताब्यात घेतले आहे.
हे वाचलेत का ? MARATHA RESERVATION : जरांगे पाटील आणि सरकारमध्ये आमदार बच्चू कडू होणार दुवा ! सरकारचे शिष्टमंडळ अंतरवली सराटीत लवकरच पोहोचणार
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी अधिवेशन बोलवा, अशी मागणी या आमदारांनी केली. आरक्षण मिळेपर्यंत माझा पक्षच नाही, अशी प्रतिक्रिया आमदार राजू नवघरे यांनी दिली आहे. तर सरकार फक्त वेळ काढूपणा करतय, अधिवेशन का बोलावत नाही, अशी प्रतिक्रिया आमदार कैलास पाटील यांनी दिली आहे.