जालना : महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षण Maratha Reservation हा मुद्दा आता शांत होईल अशी चिन्ह दिसून येत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Chief Minister Eknath Shinde यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेऊन महत्त्वाची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, ” ओबीसी आरक्षणाला OBC Reservation धक्का न लागता ज्यांच्याकडे कुणबी नोंदी आहेत त्यांना आधीपासून जे आरक्षण मिळत होतं ते मिळत राहणार आणि ज्यांच्याकडे कोणत्याही नोंदी नाहीत त्या सर्व मराठा समाजाला सरसकट स्वतंत्र आरक्षण दिलं जाणार. ” अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. त्याचबरोबर जरांगे पाटील यांनी आता आपलं उपोषण थांबवावं असं आवाहन देखील स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.
मराठा आरक्षणाच्या आपल्या मागणीसाठी मराठा आंदोलक जरांगे पाटील यांनी चौथ्यांदा आमरण उपोषणाला सुरुवात केली होती. 10 फेब्रुवारीपासून त्यांचं हे आरक्षण सुरू होतं. दरम्यान बुधवारपासून त्यांच्या प्रकृतीमध्ये अस्वस्थता जाणवत होती. त्यांच्या नाकातून देखील रक्तस्त्राव झाला. तसेच पोटदुखीमुळे देखील त्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. त्यांचीही अवस्था बघून कुटुंबीय सहकारी आणि मराठा समाजामध्ये प्रचंड असंतोषाचं वातावरण असून महाराष्ट्राच्या हिंगोली, नांदेड, परभणी आणि महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये आज चक्काजाम आंदोलन सुरू झाल आहे. मराठा समाजामध्ये प्रचंड आक्रमक वातावरण पाहायला मिळते.
दरम्यान गुरुवारी मुंबई हायकोर्टाने पाटील यांना उपचार घेण्यास काय हरकत आहे? असा सवाल उपस्थित केला. आणि त्यांनी उपचार घ्यावेत असा आदेश देखील दिला होता. त्यानंतर जरांगे पाटील यांच्यावर संध्याकाळी नंतर उपचारा सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर आता आज दुपारी एक वाजता जरांगे पाटील यांची देखील महत्त्वाची पत्रकार परिषद होते आहे. या पत्रकार परिषदेमध्ये आता राज्य सरकारने ज्या घोषणा केल्या आहेत त्यावर जरांगे पाटील आपली भूमिका काय मांडतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं आणि मराठा समाजाचे लक्ष लागला आहे. काही वेळातच आता हा मराठा आरक्षणाचा मुद्दा शांत होतो का ? हे देखील स्पष्ट होईल.