छत्रपती संभाजीनगर : ओबीसीमधून मराठा आरक्षण देण्यास मंत्री छगन भुजबळ यांनी तीव्र विरोध व्यक्त केला आहे. तसेच प्रकाश सोळके यांचे घर पेटवले आणि सनराईज हॉटेल संपूर्ण जाळण्यात आले. त्यावरुन त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर काही प्रश्न उपस्थित केले. गुन्हे मागे घ्या कसं म्हणता ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. सोमवारी पत्रकारांशी संवाद साधताना छगन भुजबळ यांनी अनेक गंभीर आरोप देखील केले आहेत.
हे वाचलेत का ? कुपवाड्यातील भारत-पाक सीमेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्या अनावरण
यावर आता छगन भुजबळ यांच्यावर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिहल्ला केला आहे. ते म्हणाले कि, ” भुजबळ साहेबांच्या नातेवाईकाचं जे हॉटेल फुटलंय ते त्यांच्याच लोकांनी फोडलंय आणि त्यांना अटक करण्यात आलेली आहे. अशी मला खात्रीलायक माहिती मिळाली आहे. षडयंत्र काय आहे हे तुम्हाला सांगतो, मला नुकतीच माहिती मिळाली. ही माहिती खोटी असेल तर मी माझे शब्द मागे घेईल. बीडचे काही बांधव काल आले होते. भुजबळ साहेबांच्या नातेवाईकाचं जे हॉटेल फुटलंय ते त्यांच्याच लोकांनी फोडलंय आणि त्यांना अटक करण्यात आलेली आहे. मराठे शांततेत आंदोलन करत आहेत. यात सत्ताधाऱ्यांचेच लोकं आमच्या मराठ्याच्या आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न करत आहेत. हा माझा दावा तंतोतत खरा आहे. तसेच पूर्ववैमन्यस्यातून एकमेकांची घरे फोडली, दगडफेक झाली आहे. मराठा समाजातील तरुणांचा या जाळपोळीशी काही संबंध नाही. समाजातील तरुणांनी शांततेत साखळी उपोषण आणि आंदोलन केले आहे.
हे वाचलेत का ? MARATHA RESERVATION : ” सोळंके, क्षीरसागरांच्या घरांवरील हल्ला नियोजित कट होता…!” छगन भुजबळांचे खळबळजनक विधान, वाचा सविस्तर
मराठा समाजाला आवाहन करतो. आपल्या गोरगरीबांचं आता कल्याण होणार आहे. फक्त एक, दोन ओबीसींना ते पाहावत नाही. त्यामुळे मराठ्यांनी शांततेत आपली एकजूट वाढवा. महाराष्ट्रातील जे मराठ्यांचे सर्व पक्षांचे नेते आहेत, त्यांना विनंती आहे, जाणूनबुजून षडयंत्र रचलं जात आहे. शांततेत आंदोलन करणाऱ्या पोरांना केसेसमध्ये अडकवले जात आहे. मराठ्याचा मुलांना तुम्ही मदत केली नाही, तर महाराष्ट्रातील मराठ्यांची पोरं तुम्हाला कधीच माफ करणार नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.