मुंबई : गेली अनेक महिन्यांपासून मराठा समाजाला सरसकट आरक्षण Maratha Reservation देण्यात यावं या मागणीसाठी मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील हे आंदोलन आणि उपोषणाचा बडगा उगारत आहेत. तर राज्य सरकार त्यांनी हे आंदोलन मागे घ्यावे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. जरांगे पाटील यांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार 20 जानेवारी रोजी जालन्यातील अंतरवाली सराटी मधून ते काही हजार मराठा आंदोलकांसह मुंबईच्या दिशेने निघाले होते. ती संख्या आज लाखोंच्या घरात आहे. अनेक वेळा स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,अनेक प्रमुख मंत्री आणि शिष्टमंडळांनी जरांगे पाटील यांची भेट घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. परंतु जरंगे पाटील हे आपल्या मागणीवर ठाम आहेत. दरम्यान सरकारने आपल्या सर्व मागण्यांवर सकारात्मक असल्याचं सांगितलं आहे. अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे.
नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे पाटील
मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत हे भगवं वादळ मुंबईमध्ये येऊन धडकलं तसं राज्य सरकारलाही धडकी भरली आहे. दरम्यान राज्य सरकारचं एक शिष्ट मंडळ मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी गेले असता त्यांच्यामध्ये चर्चा झाली आहे. यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार ते म्हणाले आहेत की, ” सरकारने आपल्या सर्व मागण्या सकारात्मक असल्याचं सांगितलं. मग आम्हा एक पाऊल मागे घेतो, सरकारने एवढं केलं असलं तर मग आम्ही आझाद मैदानाकडे जाणार नाही. आजची रात्र इथेच काढतो. सरकारने आजच्या रात्रीपर्यंत अध्यादेश काढावा. अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी केली…. नसेल तर उद्या दुपारपर्यंत अध्यादेश द्या, नाहीतर पुन्हा मुंबईकडे निघणार” असा इशारा देखील मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी दिला आहे.
त्याचबरोबर, ” जो अध्यादेश आपण काढणार आहात त्यामध्ये मराठा समाजाला मोफत शिक्षण, सगेसोयरांना कुणबी सर्टिफिकेट आणि सरकारी भरतीत आमच्या राखीव जागा . या मागण्या देखील मनोज जरांगे पाटील यांनी केले आहेत.