नागपूर : नागपूरमध्ये सध्या हिवाळी अधिवेशन Winter Session सुरू आहे. 20 तारखेपर्यंत हे हिवाळी अधिवेशन सुरू राहणार आहे. या अधिवेशनामध्ये अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा पार पडल्या आहेत. दरम्यान या हिवाळी अधिवेशनामध्ये सर्वात गाजणारा मुद्दा होता तो म्हणजे मराठा आरक्षण Maratha Reservation… या मराठा आरक्षणाबाबत आज विधानसभेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे CM Eknath Shinde यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मराठा समाजाच्या आरक्षणासाठी फेब्रुवारी महिन्यात विशेष अधिवेशन घेणार आहे. क्युरेटिव्ह याचिका हा एक आशेचा किरण आहे. ज्या त्रुटी आहे त्या दूर करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसवणारा आरक्षण देणार आहे. मागासवर्ग आयोगाच अहवाल एक महिन्यांत येईल. ” जय जवान जय किसान ही घोषणा जो समाज जगला, तोच आज आर्थिक शैक्षणिक मागास झाला आहे. या समाजाला आपली प्रगती करायची आहे अनेकांनी टोकाची पावलं उचलत आत्महत्या देखील केली असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी म्हटलं आहे.
दरम्यान मराठा आरक्षणासाठी आत्तापर्यंत अनेक तरुणांनी आत्महत्या केल्या आहेत. आजपर्यंत अनेक ठिकाणी अहिंसा देखील घडली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी उपसलेली तलवार आजही तळपते आहे. उपोषण केल्यानंतर राज्य शासनाने 23 डिसेंबर पर्यंत मराठा आरक्षणावर अंतिम निर्णय घेतला जाईल असं कबूल केला आहे. त्यामुळे आता राज्य शासन मराठा आरक्षण या गंभीर मुद्द्यावर नेमका काय निर्णय घेतो याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलं आहे. अशातच आज विधानसभेत मराठा आरक्षणावर विचारण्यात आलेल्या प्रश्नावर स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली आहे की, ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता आरक्षण मिळालं पाहिजे अशी राज्य शासनाची भूमिका आहे.
काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
यंदाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये मराठा आरक्षण या प्रमुख मुद्द्यावर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत भाष्य करताना म्हटला आहे की,
“पहिल्या दिवसापासूनच मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. ओबीसी समाज्याच्या आरक्षणाला धक्का न लागता आरक्षण मिळालं पाहिजे अशी भूमिका आहे. जय जवान जय किसान ही घोषणा हा समाज जगला आहे. हाच समाज आता आर्थिक शैक्षणिक मागास झाला आहे. त्यामुळे या समाजाला आपली प्रगती करायची आहे. अनेकांनी टोकाची पाऊले उचलत आत्महत्या केली आहे. महाराष्ट्राच्या विकासाला या समाजाचा हातभार लागला आहे. मात्र, काही दिवसांत समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. पुरोगामी महाराष्ट्राला न शोभणारी ही बाब आहे. या आंदोलनाचा फायदा कोणी घेतला नाही पाहिजे असे आवाहन करताना चर्चेतून मार्ग काढू शकतो असेही त्यांनी म्हटले. सर्वानी शांतता राखली पाहिजे. सर्व जाती पाती एकसमान आहे. सरकारसाठी हे एकसमान आहे. प्रत्येक घटकाला समान वाटा मिळाला पाहिजे. आरक्षण देण्यास सरकार कटीबद्ध असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले. “