पुणे : मराठा समाजाला Maratha Reservation सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे यासाठी मनोज जरांगे पाटील Manoj Jarange Patil यांनी मोठा लढा उभा केला आहे. आज पुण्यामध्ये त्यांना 2013 सालीच्या एका गुन्ह्यामध्ये वॉरंट बजावण्यात आले होते. त्यासाठी ते दाखल झाले होते. यावेळी हे वॉरंट आता शिवाजीनगर न्यायालयाकडून रद्द देखील करण्यात आले आहे. दरम्यान पुण्यात आज त्यांनी विधानसभा निवडणुक लढवण्याबाबत मोठी घोषणा केली आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजासाठी सगेसोयरांच्या अधिसूचनेची अंमलबजावणी जर झाली नाही आणि सरसकट कुणबी प्रमाणपत्र मराठ्यांना दिलं गेलं नाही तर विधानसभेच्या निवडणूक रिंगणात उतरणार, तसेच 288 जागांवर ही विधानसभा निवडणूक लढवणार अशी मोठी घोषणा केली आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या हितासाठी आणि सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावे यासाठी आजपर्यंत आमरण उपोषण आणि पदयात्रा असे कठोर परिश्रम घेतले आहेत. यावर अद्यापही अंमलबजावणी मात्र झालेली नाही. काही दिवसांपूर्वी त्यांनी सगेसोयऱ्यांच्या अधिसूचनेची अंमलबजावणी जर झाली नाही तर येत्या 4 जून पासून पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू करणार अशी घोषणा देखील केली होती.
भयानक वास्तव! नद्यांसोबत आता विहिरींचा देखील श्वास कोंडला; पैठणच्या MIDC तून कंपनीतील केमिकल युक्त पाणी थेट शेतकऱ्यांच्या विहिरीत
येत्या 4 जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल घोषित होणार आहे. त्यामुळे आता मराठा समाजाच्या या मागणीकडे सरकार लक्ष देणार का ? आणि मनोज जरांगे पाटील विधानसभा निवडणूक लढवणार का ? हे येणारा काळच स्पष्ट करेल.