बीड : सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यांमध्ये मनोज जरांगे पाटील Manoj Jarange Patil विरुद्ध पंकजा मुंडे Pankaja Munde असा वाद पेटला आहे. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर पंकजा मुंडे यांनी आपलं मत व्यक्त करताना त्या म्हणाल्या होत्या की, ” उपोषण करून कोणाला आरक्षण मिळत नसतं. त्यासाठी विधानसभा, संसदेत कायदा करावा लागतो. त्यासाठी निवडून आलेल्या लोकांना आरक्षणाचा प्रश्न सोडवता येतो. उपोषण केल्याने त्याचा काही फायदा होत नाही.” असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं होतं.
यावर मनोज जरंगे पाटील यांनी आपला संताप व्यक्त करताना म्हटलं होतं की, ” पंकजा मुंडे काय म्हणाल्या हे मला माहिती नाही. पण मी त्यांच्या वाट्याला गेलो नाही. त्यांनीही माझ्या वाट्याला जाऊ नये.” असं जरांगे पाटील म्हणाले आहेत.
BIG NEWS : भिवंडीत मोठी उलथापालथ विद्यमान आमदार रईस शेख यांचा राजीनामा; कार्यकर्ते आक्रमक
मनोज जरांगे पाटील यांच्या या भूमिकेनंतर पंकजा मुंडे यांनी एल्गार पुकारला आहे. मनोज जरांगे यांच्यावर मी टीका केली नाही आणि जर टीका केली तर कधीच शब्द मागे घेत नाही. मी गोपीनाथ मुंडेंची औलाद आहे. मला वंचितांसाठी आणि पीडितांसाठी काम करायच आहे. वंचित आणि पीडितांची वाली होईल. अशी शपथ मी गोपीनाथ मुंडे यांच्या चितेवर घेतली होती. आणि वंचितांच्या बाजूने उभे राहण्यासाठी मी कोणालाही घाबरत नसल्याचं पंकजा मुंडे म्हणाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात आता पंकजा मुंडे विरुद्ध मनोज जरांगे पाटील असा वाद देखील पेटला आहे.