मुंबई : महायुतीमध्ये अद्याप देखील जागा वाटपाचा पेच सुरू आहे. काही जागांवर अद्याप देखील उमेदवारीवरून नाराजी, राजीनामे अशी नाट्य सुरूच आहेत. दरम्यान महायुतीमध्ये सध्या परिस्थितीत भाजपसोबत शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सत्तेत आहेत. यानंतर आता महायुती मध्ये राज ठाकरे देखील सामील होणार अशा चर्चेला उधाण आले आहे.
काही दिवसांपूर्वी स्वतः राज ठाकरे आणि त्यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन अमित शहा यांची भेट घेतली. त्यानंतर मुंबईत आल्यावर राज ठाकरे यांनी मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत बैठका केल्या. तसेच महायुतीतील प्रमुख नेत्यांसोबत देखील बैठका पार पडल्या. त्यामुळे मनसे आता महायुतीमध्ये सामील होणार अशा चर्चेला उधाण आले होते.
परंतु मनसे महायुती सोबत जाणार याबाबत आज देखील केवळ बैठका आणि राजकीय वर्तुळात चर्चा होत आहेत. यावर अधिकृतपणे भाष्य करण्यात आलेले नाही. यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी आपली थेट प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, ” बैठका झाल्या आहेत. याबद्दल कोणतेही दुमत नाही. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व शक्यता पडताळून पाहिल्या जातात. यावर चर्चा होते. अद्याप त्या संदर्भात कुठलाही निर्णय झालेला नाही. ” असं थेट मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं.
Pune Politics : ” सुनेत्रा पवारांना आई मानता तर पाठिंबा पण द्या ” दीपक मानकरांचा सुप्रिया सुळेंवर पलटवार
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता सर्वच राजकीय हालचाली सभा, प्रचार यांना वेग आलाय. त्यामुळे आता मनसे महायुतीसोबत जाणार का ? असा सवाल समाज मनामध्ये उपस्थित होतोय.