बुलढाणा : भाजप BJP महायुतीतील रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांच्या सामन्यांमध्ये संतापाची लाट उठली आहे तर आपल्याच्या सरकारच्या विरोधात वक्तव्याने राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. बुलढाणामध्ये रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सदाभाऊ खोत आले होते. त्यावेळी त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले. ते म्हणाले कि, वक्तव्याने देशातील 80 कोटी जनता हि ऐतखाऊ आहे. त्यामुळे आता देशातील रेशन व्यवस्था कायमची बंद करून देशाला बलशाली करा अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी केली आहे.
हे वाचलेत का ? Accident : नगर रोडवरील टँकर पलटी होऊन मोठा अपघात; टँकरमधून Ethylene Oxide वायुगळतीवर नियंत्रण; मोठा धोका टळला
सदाभाऊ खोत म्हणाले की, शेतीवरचा फक्त 40 टक्के समाज उरला असून देशात 80 कोटी माणसं आयत खात आहेत. त्यामुळे देशातील रेशन व्यवस्था बंद करून देश बलशाली बनवावा अशी मागणी सदाभाऊ खोत यांनी केली. बुलढाणा जिल्ह्यातील रविकांत तुपकर यांच्या आंदोलनाला सदाभाऊ खोत भेट देण्यासाठी आले होते. आपल्या देशातील ऐतखाऊ लोकांची संख्या वाढली असून देशातील 80 कोटी माणसं आयतं खात आहेत. जर इतकी माणसं आहेत खात असतील तर हा देश भिकाऱ्यांचा आहे. माणसं भिकारी बनवण्याचे काम सुरू आहे अशीही टीका सदाभाऊ खोत यांनी केली.
हे वाचलेत का ? Water Scandal : ‘तुम्हीही तुरुंगात जाल’, दारूपाठोपाठ आता पाणी घोटाळा ! दिल्ली सरकारविरोधात भाजपचं CBI आणि उपराज्यपालांना पत्र
सदाभाऊ खोत यांनी म्हटले की, माणसाला ज्यावेळेस सगळं फुकट मिळतं समजा त्या सगळ्या अफूच्या गोळ्या आहेत. राजकीय पक्षांची चढाओढ लागली आहे हे फुकट ते फुकट त्यामुळे देश भिकाऱ्यांचा बनत चालला आहे. प्रत्येकाने श्रम करावे श्रमावरच देश बलशाली होईल असेही सदाभाऊ खोत म्हणाले.