मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस NCP शरद पवार गटाचे Sharad Pawar खासदार डॉ. अमोल कोल्हे Amol Kolhe यांनी मंत्रालयात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar यांची भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. मात्र, ही भेट मतदारसंघातील विकासकामाबाबत होती, असे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले.
नुकतीच अजित पवार गटाकडून लोकसभेतील खासदारांवर कारवाई करण्यासाठी पत्र देण्यात आला आहे. यामध्ये खासदार अमोल कोल्हे यांचे नाव वगळण्यात आला आहे. अमोल कोल्हे यांनी आधीच अजित पवार गटाला प्रतिज्ञापत्र सादर करत आपला पाठिंबा दर्शवला आहे. अजित पवार हे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. गेली अनेक वर्ष पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे असेल, इंद्रायणी मेडीसीटी असेल या अत्यंत महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी अजितदादांनी महत्त्वाची भूमिका सुरुवातीपासून घेतली आहे. या प्रकल्पांचा पाठपुरावा आणि इतर प्रकल्पांबाबत चर्चेकरिता ही भेट झाली असल्याचे डॉ. अमोल कोल्हे यांनी म्हटले. पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे हा प्रकल्प लवकरात लवकर व्हावा ही मागणी होणं गरजेचं आहे. उत्तर भारत आणि दक्षिण भारत या दोन्ही रेल्वे नेटवर्कला शिरूर मतदारसंघ जोडला जाणार असल्याचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी म्हटले.
हे वाचलेत का ? Fatima Beevi : सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश फातिमा बीवी यांचं निधन, वयाच्या 96 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
शरद पवार गटानं (Sharad Pawar Group) अजित पवार गटाचे (Ajit Pawar Group) राज्यसभेचे खासदार प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांना अपात्र करा, अशी मागणी करणारं पत्र राज्यसभेचे सभापती जगदीप धनकड यांना पत्र लिहून केली आहे. आता यालाच पलटवार म्हणून अजित पवार गटानंही शरद पवार गटाच्या आमदारांना अपात्र करण्यासंदर्भात याचिका लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सभापती यांच्याकडे दाखल केली आहे.
शरद पवार गटाविरोधात अजित पवार गट आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. शरद पवार गटानं अजित पवार गटाचे राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांना अपात्र ठरवण्यासंदर्भात राज्यसभेच्या सभापतींना एक पत्र लिहिलं. आता यालाच अजित पवार गटाकडून पलटवार करत प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. राज्यसभेतील शरद पवार, वगळता वंदना चव्हाण आणि फौजिया खान यांचं सदस्यत्व रद्द करण्याची मागणी अजित पवार गटाकडून करण्यात आली आहे. तर, लोकसभेत सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे यांना वगळून श्रीनिवास पाटील, फैजल मोहम्मद यांचं सदस्यत्व रद्द करण्याची मागणी अजित पवार गटाकडून करण्यात आली आहे.
हे वाचलेत का ? MPSC EXAM TIMETABLE : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 2024 मधील परीक्षांचे वेळापत्रक जाहीर