भाजप नेते निलेश राणे यांनी बुधवारी एक ट्विट करत अचानक राजकारणातून निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलेले होते. दरम्यान राज्याचे मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या कार्यपद्धतीमुळे निलेश राणे बाजूला होत असल्याची चर्चा होती. आज रवींद्र चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर निलेश राणे यांनी राजकारणातून निवृत्त होण्याचा निर्णय 24 तासांमध्ये मागे घेतला आहे.
रवींद्र चव्हाण निलेश राणेंची भेट घेतल्यानंतर म्हणाले कि, “निलेश राणे यांनी ट्विट केल्यानंतर नेमकं काय घडलं हे कळत नव्हतं. आम्ही याबाबत नारायण राणे यांच्यासोबत चर्चा केली आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करण्यात आली. संघटनेत काम करत असताना कार्यकर्त्यांवर अनन्या होऊ नये ही सर्वांची भावना आहे.”
रवींद्र चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत निलेश राणे यांची चर्चा झाली. त्यानंतर पुढील निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना देवेंद्र फडणवीसांनी दिल्या. त्यानुसार आता निलेश राणे यांनी आपला निर्णय बदलत, राजकारणात सक्रिय राहण्याची भूमिका घेतली आहे.