सध्या राज्यात अवकाळी पावसाचे संकट घोंगावत आहे. अशातच मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्तांची भेट घेतली.
यावेळी संपूर्ण मराठवाड्यात दिवाळीपूर्वी दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी पवार यांनी केली आहे. जर मागणी मान्य न केल्यास 10 हजार शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्याचा इशारा रोहित पवार यांनी दिला आहे.
तसेच दिवाळीच्या आधी मराठवाड्यात दुष्काळ जाहीर न झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा देखील दिला आहे. तसेच या मागणीचं निवेदन मराठवाडा विभागाच्या विभागीय आयुक्तांकडं दिलं असल्याचे रोहित पवार म्हणाले आहेत.