मुंबई : गेल्या वर्षी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाला. त्यावेळी शिवसेना सत्तेत असताना उद्धव ठाकरे यांचे सर्वात विश्वासू असलेले आमदार एकनाथ शिंदे यांनी एका रात्रीत बंड पुकारला. या बंडात आमदार एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या आमदारांमध्ये फूट पाडून गुवाहाटी गाठलं. मात्र त्यावेळी राज्यात शिवसैनिकांनी चांगलच रान पेटवलं होत. त्या बंडानंतर राज्यात ठिकठिकाणी जाळपोळ, पोस्टरला काळ फासणे, दुकानांची तोडफोड अशा विविध घटना घडल्या होत्या. त्यावेळी मुख्यमंत्री पदावर असलेले उद्धव बाळासाहेब ठाकरे आक्रमक होत शिंदे गटाच्या बंडावर तोडगा काढण्यासाठी अनेक बैठक घेतल्या. मात्र त्या बैठकांचा उद्धव ठाकरे यांना काहीही फायदा झाला नाही.
हे वाचलतं का ? वीज महाग होण्यामागे अदानीच कारणीभूत; राहुल गांधी यांचा अदानींवर गंभीर आरोप, वाचा काय म्हणाले गांधी
एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर त्यावेळी मुख्यमंत्री पदावर असलेल्या उद्धव ठाकरे यांना माघार घेत राजीनामा द्यावा लागला. त्या घटनेनंतर एकनाथ शिंदे यांच्या गटाने भाजप पक्षासोबत युती करत सत्ता स्थापन केली. या सत्ता स्थापनेत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद मिळाले तर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावे लागले. या घटना घडल्यानंतर राजकारण काही प्रमाणात स्थिर होताच पुन्हा एकदा राज्यात दुसरा भूकंप झाला. यामध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना त्यांच्याच पुतण्याने म्हणजेच अजित पवार यांनी भाजप- शिंदे गटासोबत जाऊन धक्का दिला. यानंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे नऊ आमदार सोबत घेऊन सत्ता स्थापन केली आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
हे वाचलतं का ? ड्रग्ज किंवा कुठल्याही प्रकरणात संबंध आलाच तर पदासह राजकारण सोडेन; दादा भुसेंनी स्पष्टच सांगून टाकले, वाचा सविस्तर
या पार्शवभूमीवर पुन्हा उद्या राज्यात मोठा बदलावं पाहायला मिळणार आहे. विधानसभा निवडणुकीला अगदी काही दिवस बाकी असताना शिंदे गटाला एक जोरदार धक्का बसण्याची चित्र दिसत आहेत. आता शिंदे गटाचे माजी आमदार पांडुरंग बरोरा हे एकनाथ शिंदे यांना रामराम ठोकणार आहेत. पांडुरंग बरोरा हे उद्या गुरुवारी 19 ऑक्टोबरला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये म्हणजेच शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. या पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम उद्या संध्याकाळी पाच वाजता पार पडणार आहे. महत्वाचं म्हणजे पांडुरंग बरोरा यांनी राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश केल्यानंतर शहापुर येथे मोठी जाहीर सभा घेणार आहेत.