मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार सरकारवर नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आले असताना अजित पवार यांची प्रकृती बरी नसल्याचं कारण सत्ताधाऱ्यांनी दिले आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारी कार्यक्रमांमध्ये अजित पवार यांच्या गैरहजेरीमुळे अजित पवार हे सरकारवर नाराज असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत.
अजित पवारांच्या नाराजीचे चर्चेदरम्यान केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री भारतीय जनता पार्टीचे नेते रावसाहेब दानवे यांनी अजित पवारांची भेट घेतली भेट घेतल्याचा दावा केला जात आहे.
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना रावसाहेब दानवे म्हणाले की, अजित पवार आणि दीपक केसरकर हे गेली अनेक वर्षे राजकारणात आहे. यापूर्वी ते वेगवेगळ्या पक्षांमध्ये होते. आता महायुतीत एकत्र आलो असून राज्यात काम करत आहोत. त्यामुळे आमच्या भेटीगाठी हे काही नवीन नाही. 5 ऑक्टोबरला दीपक केसरकर यांनी मला फोन केला होता आणि माझंही त्यांच्याकडे काम होतं. म्हणून मी त्यांना भेटायला आलो होतो. तसेच यावेळी अजित पवार यांच्याकडेही गेलो मतदार संघातले काही विषय असतात ते सोडवण्यासाठी राज्यातल्या मंत्र्यांना भेटावं लागतं. कधी त्यांना केंद्रात काम असतं जसं माझ्याकडे रेल्वे खात आहे. एकत्र भेटल्यावर कामांची आणि विचारांची देवाण-घेवाण होते. वेगवेगळे प्रश्न मार्गी लागतात आज दीपक केसरकरांना भेटलो. माझे जे विषय होते ते मार्गी लागले. दादांकडे गेलो तिथे त्यांचे विषय मार्गी लागले. सरकारचे दोन मंत्री भेटन काही नवीन गोष्ट नाही. असेही यावेळी रावसाहेब दानवे म्हणाले आहेत.