मुंबई : गेल्या दीड वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये फुटीचे राजकारण MAHARASHTRA POLITICAL CRISIS सुरू आहे. सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Chief Minister Eknath Shinde यांनी शिवसेनेतून बंड करून भाजपसोबत सत्ता स्थापन केली होती. नुकतीच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी याबाबत निर्णय देऊन खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच असून सर्व आमदार पात्र असल्याचा निर्वाळा दिला होता. हा निर्णय अमान्य करून शिवसेना ठाकरे गट आता सुप्रीम कोर्टाकडे दाद मागणार आहे.
शिवसेना ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे. याची केवळ आता सुप्रीम कोर्टाने एकनाथ शिंदे यांना नोटीस जारी करून पुढच्या दोन आठवड्यात आपलं म्हणणं सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
10 जानेवारी रोजी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल हा पूर्णपणे एकनाथ शिंदे यांच्या बाजूने दिला होता. दरम्यान आता हे संपूर्ण प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले आहे. एकनाथ शिंदे आणि इतर 39 आमदारांना नोटीस जारी करण्यात आली आहे. या सर्व आमदारांना देखील पुढच्या दोन आठवड्यात आपलं म्हणणं सादर करावे लागणार आहे. तसेच दोन आठवड्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये पुढची सुनावणी होणार आहे.
https://www.facebook.com/share/v/efbxq4DtpuG7Zry3/?mibextid=qi2Omg