MAHARASHTRA POLITICAL CRISIS : सर्वोच्च न्यायालयाने खडेबोल सुनावल्यानंतर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रताप्रकरणी सुनावणीचे वेळापत्रक जाहीर केले होते. त्यानुसार 13 ऑक्टोबररोजी सुनावणी होणार होती. मात्र, ही सुनावणी आता अलीकडे घेण्यात आली असून 13 एवजी 12 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे.
नवीन वेळापत्रकानुसार, 12 ऑक्टोबरला दुपारी 2 वाजता सुनावणी होणार आहे. विधानसभा अध्यक्षांकडून सुनावणीचे नवीन वेळापत्रक ईमेल द्वारे शिंदे गट व ठाकरे गटाला पाठवण्यात आले आहे. जी 20 संदर्भात 13 ऑक्टोबरला दिल्लीत बैठक होत आहे. बैठकीत राज्यातील महत्त्वाचे नेते, अधिकारी जाणार असल्याने सर्वांच्या सोईसाठी आता सुनावणी एक दिवस आधी ठेवल्याचे सांगितले जात आहे.