परभणी : सध्या महाराष्ट्रामध्ये सर्वच पक्षाचे प्रमुख नेते जोरदार प्रचार करत आहेत. आज अमित शहा आणि राहुल गांधी हे अमरावतीच्या दौऱ्यावर आहेत. तर मंगळवारी उद्धव ठाकरे हे परभणीच्या दौऱ्यावर होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी समोरच्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त करा असं थेट आवाहन परभणीच्या मतदात्यांना केल आहे.
महायुतीच्या वतीने महादेव जानकर यांना परभणीतून उमेदवारी देण्यात आली आहे. यांच्या सभेनंतर आज महादेव जानकर यांनी एक मोठी घोषणा केली आहे. ते म्हणाले की परभणीतून निवडून आलो नाही तर संन्यास घेईल.
पहिल्या टप्प्यातला निवडणुका महाराष्ट्रामध्ये पार पडल्या आहेत. तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेसाठी आज प्रचाराचा शेवटचा दिवस होता. दरम्यान परभणीतील सभेला महादेव जानकर यांनी थेट उत्तर दिल आहे. ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांना शेतकऱ्याचे पोरगं मुख्यमंत्री झालेलं आणि माझ्यासारखा बहुजन पोरगा खासदार झालेला देखत नाही का ? त्याचबरोबर 26 एप्रिल नंतर मी राज्यभरात उद्धव ठाकरेंच्या विरोधात रान पेटवणार असल्याचे देखील मोठे वक्तव्य त्यांनी केल आहे.