माढा : माढ्यातील लोकसभा निवडणुकीची Madha Lok Sabha Election 2024 चुरस आता वाढली आहे. गेल्या काही दिवसांपासून धैर्यशील मोहिते पाटील यांच्या नाराजी बाबत वादळ उठले आहे. मोहिते पाटील हे माढ्यातील बडे प्रस्थ आहे. असं असताना महायुतीने रणजीत सिंह निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली आणि त्यानंतर हे नाराजीचे नाट्य सुरू झाले.
मोहिते पाटील यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी हात मिळवणी केली आहे. आज त्यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांची भेट घेतली. ते लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करतील अशा बातम्या येतच होत्या. त्यावर आता शिक्कामोर्तब झाला आहे येत्या. येत्या 14 एप्रिलला ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत धैर्यशील मोहिते पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. तर 16 एप्रिलला ते माढ्यातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
Maharashtra Politics : मंत्री धर्मराव आत्राम यांचा गौप्यस्फोट; विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार 4 जून नंतर भाजपमध्ये सामील होणार ! राजकीय वर्तुळात खळबळ
धैर्यशील मोहिते पाटील यांच्या या मोठ्या पावलानंतर माढ्यातील लोकसभा निवडणुकीची लढत आता चुरशीची होणार आहे. महाविकास आघाडीच्या वतीने धैर्यशील मोहिते पाटील हे निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. तर महायुतीच्या वतीने रणजीतसिंह निंबाळकर यांचे आव्हान आता समोरा असणार आहे.