बारामती : लोकसभा निवडणुकीच्या Lok Sabha Elections पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये राजकीय वातावरण प्रचंड ढवळले गेले आहे. महाविकास आघाडी आणि सत्ताधाऱ्यांमध्ये सध्या बैठका सुरू आहेत. जागा वाटपावरून अद्याप तिढा सुटलेला नसतानाच आता बारामतीमध्ये सुप्रिया सुळे Supriya Sule यांच्या उमेदवारीचे बॅनर झळकताना दिसून येत आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
सध्या राज्यात बारामतीकडे सर्वांचेच लक्ष लागल आहे. बारामतीमधून राष्ट्रवादी अजित पवार गटाची उमेदवारी हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना जवळपास निश्चित झाली असल्याची माहिती आहे. तर आता महाविकास आघाडीकडून अद्याप बारामतीची जागा नेमकी कुणाला द्यायची हा तिढा सुटलेला नसतानाच सुरुवातीला स्वतः सुप्रिया सुळे यांनी आपल्या स्टेटसवर उमेदवारी विषयी भाष्य केलं होतं. तर आज थेट बारामतीमध्ये त्यांच्या उमेदवारीचे बॅनर झळकताना दिसत आहेत.
दरम्यान या बॅनरवर राजकीय वर्तुळात चर्चा रंगते आहे. या बॅनरवर उमेदवाराचे नाव सुप्रिया सुळे, निशाणी तुतारी फुंकणारा माणूस असा थेट प्रचार सुरू झाला आहे. खरंतर अद्याप महाविकास आघाडीकडून बारामतीची जागा ही निश्चित करण्यात आलेली नाही. अशातच स्वतः सुप्रिया सुळे यांनी आपल्या स्टेटसवर आणि आता बॅनर मधून आपल्या उमेदवारीचा उल्लेख केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगते आहे.