बीड : सध्या लोकसभा निवडणुकीच्या Lok Sabha Elections पार्श्वभूमीवर राजकीय वातावरणात हालचालींना प्रचंड वेग आलाय. आघाडी आणि सत्ताधाऱ्यांमध्ये अनेक खलबती आणि बैठका सुरू आहेत. युतीमध्ये आता अंतर्गत हालचालींना देखील प्रचंड वेग आलेला पाहायला मिळतोय. आज स्वतः अमित शहा हे अकोल्यामध्ये आहेत. दरम्यान आता एक मोठी बातमी समोर येते आहे. बीड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी कोणाला मिळणार ? याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असतानाच पंकजा मुंडे यांच्या नावाची देखील जोरदार चर्चा होत आहे.
दरम्यान डॉक्टर प्रीतम मुंडे या सध्या बीड मतदार संघाच्या विद्यमान खासदार आहेत. 2014 आणि 2019 ला त्या बीड लोकसभा मतदारसंघातून विजयी झाल्या होत्या. आता यावेळी भाजप कोणाला उमेदवारी देणार याविषयी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू असतानाच पंकजा मुंडे यांना यावेळी उमेदवारी दिली जाऊ शकतील अशी दाट शक्यता सूत्रांनी दिली आहे. तर काही दिवसांपूर्वीच एका सभेमध्ये बोलत असताना पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या की. ” काहीही झालं तरी बहिणीला बाजूला करून मी पुढे जाणार नाही. ” त्यांच्या या वक्तव्यामुळे आता भाजप नेमका काय निर्णय घेते ? नेमकी उमेदवारी कोणाला मिळते ? आणि जर उमेदवारी पंकजा मुंडे यांना देण्याचं भाजपन जाहीर केलं तर पंकजा मुंडे ही निवडणूक लढवणार का ? हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.